शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा...

Foto
पाऊस नाही त्यातच खतांमुळे अडचणी वाढल्या, बहूतांशी जलसाठे तळाला

फुलंब्री, (प्रतिनिधी): रोहिणी नक्षत्र कोरडे गेले, आता मृग सुरु होऊन काही दिवस झाले आहेत. तरी प्रत्यक्षात पाऊस पडलेला नाही. परिणामी शेतकऱ्यांची पेरणी थांबली असून खतासाठी वण वण फिरण्यामुळे शेतकरी पार वैतागून गेला आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाचे आगमन होवून बहूतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. 

यंदा मात्र जून महिन्यात पावसाचा कोणताच अंदाज दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच काहींनी धूळ पेरणी केली खरी परंतू पेरणी केलेली बियाणे पाखरे थव्याच्या थव्याने येत खात आहे. दरम्यान, पाऊस पडला की पिकांना देण्यासाठी खताची तत्काळ गरज असते यंदा मात्र ऑनलाइन प्रकारामुळे अद्याप बहुतांश शेतकरी खतापासून वंचित आहे.

ऑनलाईन खत विक्री मधील तांत्रिक अडचण पाहता शेतकऱ्यांनी ऑफलाईन खत उपलब्ध करून दिल्या जावी अशी मागणी करु लागले आहे. ऑनलाईन खत विक्रीचे तांगडे पाहता ही प्रणाली म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाली आहे परिणामी सुविधेसाठी सुरु झालेली ही प्रणाली शेतकऱ्यांसह विक्रेत्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.
पावसाने दडी मारली अद्याप तालुक्यातील उन्हाळाच संपला नाही, यामुळे यावर्षी पाऊस येतो की नाही अशी भीती व्यक्त होताना दिसत असून पावसाअगोदर पेरणी करणारे शेतकरी कमी आहेत. 

कारण विहिरींनी तळ गाठले आहे. मोठे धरण अर्थे झाले, तर तलाव पाझर तलाव हे कोरडे झाले आहे. यामुळे पिण्याचा प्रश्न देखील गंभीर होत आहे. कान्होरी येथील अवचित म्हस्के या शेतकऱ्याने या सर्व वैतागात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शासनाने सर्व अनुदानित योजना पहिल्यांदा बंद केल्या पाहिजे, यात लाडकी बहीण बसचा मोफत व अर्थ भाडे प्रवास तसेच शेतकऱ्यांना अनुदान म्हणुन सहा हजार दिले जातात.

 आशा सर्व योजना बंद करून हा पैसा शेतकऱ्यांच्या खतासाठी व बियांसाठी वापरला. तर शेतकरी वन वन फिरणार नाही बसचे अर्थ भाडे व खत्यावर लाडक्या बहिणीचे डिड हजार या मुळे महिला काहीही निमित्त करून बस प्रवासात व्यस्त आहे. यामुळे महिलांचे शेतीत काम करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. या साठी सर्व अनुदानाच्या योजना बंद कराव्या असे शेतकरी अवचित म्हस्के यांनी सांगितले.